मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अणुकरारास डाव्यांचा विरोध कायम
भाषा
संयुक्त पुरोगामी आघाडी व डाव्या पक्षात अणुकरार मुद्दयावरील समितीच्या मंगळवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अमेरिकेसोबतच्या आण्विक करारास विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

हाईड कायद्यात 123 करारात अंतर्भाव करण्यात आला असून या तरतुदीसहित कराराबाबत प्रगती करण्यास सरकारला विरोध करणार असल्याचे पॉलिटब्युरोचे सदस्य सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले. उद्याचा बैठकीत आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेसोबत (आयएईए) सरकारची काय चर्चा झाली हे जाणून घेण्यात येईल.

अणुकराराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने फेब्रुवारीमध्ये आयएईए सोबत सुरक्षा करारावर वाटाघाटी केल्या, मात्र डाव्यांच्या कडव्या विरोधामुळे करारावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देणार्‍या डाव्यांनी कराराचा अभ्यास केल्यानंतरच स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरला आहे. उद्याच्या बैठकीत भारताने करारावर स्वाक्षरी करावी काय, यावर चर्चा होईल.

आणखी
त्या 'खासदारांना' अध्यक्षांचे अभय
निवडणुकपश्चात युती नाही-देवेगौडा
केंद्राचा बिहारवर अन्याय- कीर्ती आझाद
देवेगौडांचे मतदारांना कर्जमाफीचे आश्वासन
अंबानींना विरोध करणार्‍या शेख यांची बदली
नंदीग्राममध्ये पुन्हा हिंसेचा उद्रेक