मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चीनची अण्वस्त्रसज्जता भारतासाठी चिंतादायक
भाषा
चीनने अण्वस्त्रसज्ज पाणडूबी बांधल्याने भारताने चिंता व्यक्त केली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्दयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा दृष्टिकोनातून भारतासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे नौदलप्रमुख सुरेश मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

चीनने क्षेपणास्त्र वाहक क्षमता असलेल्या सुमारे पाच पाणडूबी बांधल्याचे स्पष्ट झाले आहे. आण्विक नौका तळ चिंतेचा विषय नसून शेजारी देशात बांधण्यात येणार्‍या आण्विक नौका चिंतेचा विषय आहे.

संरक्षणमंत्री ए के अँथनी यांनी यावर भारतीय लष्कर कोणतेही आव्हान ‍स्वीकारून सुरक्षा हित जपण्यास समृद्ध असल्याचे विधान केले आहे. दक्षिण चीन समुद्रात बांधण्यात आलेल्या युद्धनौकांमुळे भारताच्या सुरक्षेवरील परिणामाची विश्लेषण बैठकीत होईल.
आणखी
अणुकरारास डाव्यांचा विरोध कायम
त्या 'खासदारांना' अध्यक्षांचे अभय
निवडणुकपश्चात युती नाही-देवेगौडा
केंद्राचा बिहारवर अन्याय- कीर्ती आझाद
देवेगौडांचे मतदारांना कर्जमाफीचे आश्वासन
अंबानींना विरोध करणार्‍या शेख यांची बदली