बाल मॅराथॉनपटू बुधियाचा प्रशिक्षक बिरांची दास याचा खून करणार्या प्रमुख आरोपीस गोवा व ओरिसा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने दोन वर्षापूर्वी फरार घोषित केलेला राजा आचार्य याने गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले की ओरिसा पोलिसांच्या दाव्याप्रमाणे अटक करण्यात आली, याबाबत परस्परविरूद्ध वृत्त आहे.
राजा आचार्यने अडीचच्या सुमारास पणजी पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. तोपर्यंत तो गोव्यात असल्याबद्दल पोलिसांना माहिती नव्हती, असे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ओरिसा पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारावर त्याचा छडा लावला. याद्वारे आचार्य दक्षिण गोव्यात असल्याचे निश्चित झाले, असेही सांगण्यात आले.
ओरिसा पोलिसांनी आचार्य यास स्थानिक पोलिसांसमोर आम्पसमर्थन करण्यास सांगितल्यानंतर याबाबत गोवा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र भुवनेश्वरचे पोलिस आयुक्त बिनोय बेहेरा यांनी राजाने आत्मसमर्पण केले नसून गोवा पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यास अटक केल्याचे स्पष्ट केले.
|