चित्रपट अभिनेत्यांनी पडद्यावर धूम्रपान व मद्यपान टाळून तरूणांसमोर आदर्श निर्माण करावा यासाठी आग्रही केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास व अमिताभ बच्चन यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आले आहे.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमिताभ यांच्यामुळे लाखो मुलांची धूम्रपान व मद्याच्या आहारी जाणे, आपणांस आवडणार नसल्याची टिपणी केली. अमिताभ यांनी रामदास यांनी अगोदर सरकारी कर्मचार्यांना यासाठी प्रतिबंध करावा, अशी टिपणी केली होती.
अमिताभ पोलिओचे ब्रँड अँम्बेसॅडॉर असून त्यांच्यामुळे लाखो स्त्रिया मुलांना पोलिओ ड्रॉप देण्यासाठी बूथवर आणतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले व त्यांचे अभिनंदनही केले. धूम्रपान व मद्यपान यासारख्या गोष्टींचे उदात्तीकरण व्हायला नको,असे त्यांनी स्पष्ट केले.
|