परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायिका आशा भोसले यांना आपापल्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सोमवारी पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला.
इंफोसिसचे सर्वेसर्वा एन आर नारायण मूर्ती व प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक पीआरएस ओबेरॉय यांनाही सन्मानित करण्यात आले. एव्हरेस्टवर पहिल्यांदा पाय ठेवणारे सर एडमंड हिलरी यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.
विख्यात लेखक डॉमिनिक लापियेर, शिक्षक शामा छोना शास्त्रीय संगीतकार उस्ताद रहीम फहीमुद्दी खान डागर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिक्कीचे सरचिटणीस अमित मित्रा, खेळाडू भुला चौधरी, पत्रका विनोद दुवा व राजदीप सरदेसाई यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
|