मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अमेरिकनंच जास्त 'खादाड'-पवार
भारत आणि चीनमधील मध्यमवर्गियांचे खाणे वाढल्यानेच जागतिक अन्न धान्य तुटवडा निर्माण झाल्याचे आरोप अमेरिकेने केल्यानंतर प्रथम कृषीमंत्री शरद पवार यांनी यावर अमेरिकेला चांगलेच खडसावले आहे.

भारतापेक्षा अमेरिकीच अधिक खादाड असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.जॉर्ज बुश यांनी आधी अमेरिकेचा विचार करावा आणि मग इतर देशां विषयी काही मत व्यक्त करावे असा टोमणाही पवार यांनी यावेळी बुश यांना लावला.


भारताच्या मानाने अमेरिकेत एका व्यक्तीला अधिक जेवण लागत असल्याचे स्पष्ट करत, अन्न आणि कृषी संघटनेने अर्थात ग्लोबल फूड मार्केटने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून यात 2007 ते 08 या वर्षात अमेरिकेत अन्नधान्याच्या मागणीत 11.81 टक्के वाढ झाल्याची माहितीही पवार यांनी दिली.
आणखी
नंदीग्राममधील स्थितीवर केंद्राचे लक्ष:दासमुंशी
कर्नाटक निवडणुकीत विक्रमी उमेदवार
'राम सेतू'स स्मारकाचा दर्जा देता येईल?
वेणुगोपाल परत 'एम्स'च्या संचालकपदी
मी बजरंगदलाचा सदस्य- अर्जुन सिंह
राजीनामा देणार नाही- रामदास