कॉग्रेस हायकमांडने आपल्यावर जी जबाबदारी सोपवली, ती आपण अत्यंत निष्ठेने पार पाडत असल्याचे सांगतानाच कर्नाटकमधील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
कृष्णा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेने कनार्टकमधील राजकारण सध्या ढवळून निघालेस आहे. या विषयी बोलताना कृष्णा यांनी अशा कोणत्याही शक्यतेला नकार देत आपण केवळ पक्ष प्रचारावर सध्या लक्ष केंद्रित केले असून, वरिष्ठांच्या निर्णयानुसार आपण यापुढेही काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या आगामी कर्नाटक निवडणुकांची जबाबदारी कॉग्रेसने त्यांच्यावर सोपविली आहे.
|