सत्ताधार्यांची न शमलेली भूक आणि राज्यातील अस्थिर सरकारमुळे देशात कर्नाटकची प्रतिमा अत्यंत मलिन झाल्याची खंत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली.
कर्नाटक निवडणूकां निमित्त ते सध्या बेंगलूरू दौर्यावर असून कॉग्रेस कमेटीत कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही खंत व्यक्त केली.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अस्थिर वातावरण आहे. राजकार्यांची सत्तेची हाव याला जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता केली.
टेणार्या निवडणुकांमध्ये राज्यात स्थिर सरकार सत्तेवर येणे गरजेचे असल्याचेही मनमोहन यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये तीन टप्प्यात मतदान होत असून, सध्या सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचाराने वेग धरला आहे.
येत्या 10 मे रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे, तर यानंतर 16 आणि 22 मेला प्रत्येकी दुसर्या आणि तीसर्या टप्प्यात मतदान होणार आहे.
|