सीमा सुरक्षा दलाने जम्मूत सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. येथील बेंगलार्ड भागात घुसखोरीचा प्रयत्न करत असलेला समूह आढळल्यानंतर सुरक्षा दलाने गोळीबार करून त्यांना हाकलून लावले.
घुसखोरांच्या समर्थक पथकाने त्यांना वाचण्यासाठी लष्करावर प्रतिहल्ला केल्यानंतर दोन्ही बाजूने सुमारे पंधरा मिनिटे फैरी झाडण्यात आल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.
|