जम्मू-काश्मीरमधील कातरा येथील वैष्णोदेवी छावणीत एका महिलेचा कथितरीत्या अन्नातून विषबाधा झाल्याचे मृत्यू झाला असून आणखी एकीची प्रकृती चिंताजनक आहे. राजदानी दिल्लीच्या रहिवासी रानो देवी व संगिता बजाज येथे तीर्थयात्रेसाठी आल्या होत्या.
स्थानिक निवासस्थानातून अन्नाचे सेवन केल्यानंतर दोघींची प्रकृती बिघडल्यानंर त्यांनी शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले.
रूग्णालयात पोहचण्यापूर्वी राणो देवींच्या प्राणज्योत मालवली तर संगिता यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अधिकार्याने सांगितले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून कुटुंबीय व निवासस्थानातील कर्मचार्यास विचारपूस सुरू आहे.
|