मध्याप्रदेशातील मंदसौर येथील पशुपतीनाथ मंदिरात एक लाख डॉलरचा चेक( भारतीय चलनात चाळीस कोटी) आढळून आला आहे.
मंदिराच्या व्यवस्थापन समितीने हा चेक पडताळणीसाठी बँक ऑफ इंदौरमध्ये दिला आहे. चेकवर बँक ऑफ झिंम्बॉब्वे असे नाव असून, चेकवर डॉक्टर गोनो यांची स्वाक्षरी आहे.
दानपेटीत चेक व्यतीरिक्त पावणे दोन लाख रुपये, बहरिनचे काही दिनार, हॉंगकॉंगचे 20 डॉलर आणि अन्य काही देशांचे चलन मिळाले आहे.
|