चीनच्या आण्विक पाणबुडीच्या हालचालीवर नौदल लक्ष ठेवून असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल सुरेश मेहमता यांनी स्पष्ट केले. दक्षिण चीनच्या समुद्रात चीनचा नुकताच प्रकाशात आलेल्या तळाबाहेर या पाणबुडीचा संचार आहे.
भारतास या तळाबाबत खूप दिवसांपासून माहिती असून विशेष धोक्याची शक्यता नाही. चीनची हिंदमहासागरात प्रवेश करण्यास उत्सुक असून येथे येण्याची त्यांची इच्छा असणारच, याबाबत शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टने घेतलेल्या उपग्रह छायाचित्रातून येथील चीनचा नौदल तळ उघडकीस आला होता.
|