कर्नाटक विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरवात झाली. या टप्प्यात ८९ मतदारसंघात मतदान होईल. त्यासाठी ९५३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात १७ महिला आहेत.
आज मतदान होणार्या भागात तुमकूर, बंगळूर, बंगळूर ग्रामीण, कोलाकर, चिक्कबल्लारपूर, रामनगर, मांड्या, हसन, कोडगू, म्हैसूर व चामराजनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी स्थानिक पोलिसांसह शेजारच्या राज्यातूनही पोलिस बळ मागविण्यात आले आहे. शिवाय केंद्रीय निमलष्करी दलाच्या दोनशे कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
या ८९ मतदारसंघात जवळपास १८ हजार मतदान केंद्रे आहेत. १७.३ दशलक्ष मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
|