मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला जिवंत जाळले
एएनआय
उत्तर प्रदेशातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी एका नरभक्षक बिबट्याला जिंवत जाळून आपला राग शांत केला. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बिलाहपूर गावात शुक्रवारी (ता.९) ही घटना घडली.

या बिबट्याने गेल्या डिसेंबरपासून पाच जणांचे प्राण घेतले आहेत. शिवाय त्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी त्याला मारायचे असे जणू ग्रामस्थांनी ठरविले होते. तो जेथे लपल्याचे ग्रामस्थांना कळले त्या जागेला वेढा घातला. पण त्याने वेढा तोडून पळून जायचा प्रयत्न केला. 'त्याने माझ्यावर हल्ला केला. पण मी त्याचे पाय धरून ठेवले. तो माझे डोके खाण्याचा प्रयत्न करत होता. पण माझा खांदा त्याला जवळ होता. त्यामुळे त्याने खांद्यावर हल्ला केला, असा चित्तथरारक अनुभव राम नरेश या जखमी ग्रामस्थाने सांगितले.

वनाधिकार्‍यांनी या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात केला होता. पण तो अयशस्वी झाला होता.
आणखी
कर्नाटकात पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू
नौदल चीनच्या हालचालीबाबत दक्ष:मेहता
मंदिराच्या दानपेटीत चाळीस कोटीचा चेक
एक लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार
बीसीसीआय खासदारांनाही तंदुरुस्त ठेवणार
जगात सर्वाधिक मधुमेही भारतात