अल्पसंख्याक समुदायाला तांत्रिक कौशल्य व आधुनिक शिक्षण देण्याची गरज असल्याची गरज कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.
जामिया हमदर्द विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंहही यावेळी उपस्थित होते.
देशातील अल्पसंख्याकांच्या संस्थांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज सरकारला वाटते आहे असे सांगून हा दर्जा वाढविण्यास सरकार बांधील आहे, असे त्यांनी नमूद केले.
|