मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अखिलेश दास यांचा बसपमध्ये प्रवेश
भाषा

माजी केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे बडे नेते अखिलेश दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बहुजन समाज पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य सिराज मेहंदी यांनीही बसपला जवळ केले आहे.

मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांना एका कार्यक्रमाद्वारे पक्षात प्रवेश दिला. अखिलेश दास यांना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव केले. आगामी लोकसभा निवडणुकीत लखनौहून त्यांना उमेदवारी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. श्री. दास लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण देशभरात फिरून वैश्य समाजाला बसपशी जोडण्याचे कार्य करतील, असेही त्या म्हणाल्या.
आणखी
अल्पसंख्याकांना तंत्र शिक्षणाची गरज-सोनिया
गांधीजींनी ओढला होता अर्जुनसिंहांचा टाय
संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला जिवंत जाळले
कर्नाटकात पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू
नौदल चीनच्या हालचालीबाबत दक्ष:मेहता
मंदिराच्या दानपेटीत चाळीस कोटीचा चेक