कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 66 टक्के मतदान झाले. एकूण दोनशे चोवीस पैकी 89 जागांसाठी काल सुमारे पाऊणे दोन कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
संपूर्ण राज्यात मतदान शांततेत पार पडले असून कोठेही मतदान केंद्र ताब्यात घेणे किंवा हिंसा घडली नसल्याचे निवडणुक उपायुक्त आर भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात 64 टक्के मतदारांनी तर शहरी भागात 50 टक्के मतदारांनी हक्क बजावला. अकरा जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीसाठी साडेअठरा हजार मतदानकेंद्रे तैनात करण्यात आली होती.
|