मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर?
भाषा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा काल (शनिवारी) संपल्यानंतर सोळा मे रोजी होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार मोहिमेची रणधुमाळी उडाली आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एनडीटिव्ही वृत्तवाहिनीने जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचणीत एकूण 89 पैकी भाजपास 31, धर्मनिरपेक्ष जनता दलास 30 तर कॉंग्रेसला 25 जागा मिळण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे.काल अकरा जिल्ह्यात 89 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान ए डी देवगौडा व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एस एम क्रिश्ना यांच्या बालेकिल्ल्याचाही समावेश होता.

देवेगौडा व त्यांचे पुत्र एच डी कुमारस्वामी आजपासून उडपी व दक्षिण कर्नाटकात प्रचाराचे रान उठवतील. एस एम क्रिश्ना यांचा दौराही व्यस्त असून त्यांनी शिमोगा भागात लक्ष केंद्रित केले आहे. भाजपा नेते बी एस येडीयुरप्पा व प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडाही येथे ठाण मांडतील.

येडीयुरप्पा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण निवडणुक लढवत असून समाजवादी पक्षाने एस बंगारप्पा यांच्याविरूद्ध शिकारीपुरा मतदारसंघातून ते निवडणुक लढवत आहेत. बंगारप्पा यांना कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे समर्थन येथे लाभले असल्याचे येडीयुरप्पांसाठी लढाई कठिण ठरणार आहे.
आणखी
कर्नाटकात निवडणुकीत साठ टक्के मतदान
उत्तर भारतीयांची आता 'राष्ट्रवादी शिवसेना'
अखिलेश दास यांचा बसपमध्ये प्रवेश
अल्पसंख्याकांना तंत्र शिक्षणाची गरज-सोनिया
गांधीजींनी ओढला होता अर्जुनसिंहांचा टाय
संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला जिवंत जाळले