मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पवारांचे 'सपुआ'स भक्कम करण्याचे आवाहन
भाषा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या खंबीरपणे पाठीशी राहिल्याची आठवण करून देतानात संयुक्त पुरोगामी आघाडीस (सपुआ) भक्कम करण्याचे आवाहन केले आहे.

विरोधक व आघाडीतील डाव्या घटकपक्षांनी सरकार अस्थिर करतानाच सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच पक्षाचा सरकारला भक्कम पाठिंबा राहिला आहे. धार्मिक व फॅसिस्ट विचारधारेविरूद्ध पक्षाचे लढा कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसने व्यापक दृष्टिकोनातून व्युवरचना व धोरणाची अंबलबजावणी न केल्यास धार्मिक शक्तींचा प्रभाव वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. लहान पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे मोठ्या पक्षाचे कर्तव्यच आहे. सरकारचे शेतीविषयक धोरण यशस्वी ठरत असून विक्रमी उत्पादनातून ते सिद्ध होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आणखी
देशात कोठडी मृत्यूच्या संख्येत वाढ
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर?
कर्नाटकात निवडणुकीत साठ टक्के मतदान
उत्तर भारतीयांची आता 'राष्ट्रवादी शिवसेना'
अखिलेश दास यांचा बसपमध्ये प्रवेश
अल्पसंख्याकांना तंत्र शिक्षणाची गरज-सोनिया