केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अकराशे कोटीच्या बराक क्षेपणास्त्र व्यवहारात कथितरीत्या गैरव्यवराच्या चौकशीअंतर्गत यूपीएससीचे अध्यक्ष सुबीर दत्ता यांना विचारपूस केली आहे.
याबाबत सीबीआयने गुप्तता पाळली आहे मात्र अधिकार्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना विचारपूस करण्याअगोदर काही तथ्य पडताळून पाहण्यासाठी त्यावेळी संरक्षण सचिव असलेल्या दत्ता यांना विचारपूस करण्यात आल्याचे समजते. इस्त्रायलसोबत 2000 मध्ये क्षेपणास्त्र व्यवहार झाला होता.
इस्त्रायलकडून बराक क्षेपणास्त्राच्या खरेदीची आवश्यकता पटवून देण्यासाठी सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीसमोर फर्नांडिस यांनी ठेवलेल्या 'नोट' मध्ये व्यवहारास काही शास्त्रज्ञांनी घेतलेले आक्षेप वगळण्यात आले होते. सीबीआयने दत्ता यांना याबाबत विचारपूस केल्याचे समजते. दत्ता यांची कॉफीनं घोटाळ्याप्रकरणीही विचारपूस करण्यात आली होती.
|