मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कर्नाटकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 49 उमेदवार
भाषा
कर्नाटकात दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत सहासष्ट जागांसाठी मतदान होणार असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सुमारे एकोणपन्नास उमेदवार रिंगणात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे तेरा, बहुजन समाज पक्षशने सात, कॉंग्रेसचे नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आठ व इतर पक्षाचे बारा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटीक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने कर्नाटक इलेक्शन वाच अभियानाअंतर्गत हे तथ्य उघडकीस आणले आहे.

यापैकी चौघाविरुद्ध खून किंवा खुनाचा प्रयत्न, इतरांवर शस्त्राने वार, फसवणूक, जीवे मारण्याची धमकी यासारखे अनेक गुन्हे उमेदवारांवर असल्याचे अभियानाचे प्रमुख त्रिलोचन शास्त्री यांनी सांगितले. याअगोदरच्या‍ निवडणुकीत भाजपचे 21, कॉंग्रेसचे बारा, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एकोणीस उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
आणखी
बस नदीत कोसळून आठ जवान ठार
संरक्षण व्यवहारप्रकरणी दत्ता यांची विचारपूस
पवारांचे 'सपुआ'स भक्कम करण्याचे आवाहन
देशात कोठडी मृत्यूच्या संख्येत वाढ
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर?
कर्नाटकात निवडणुकीत 66 टक्के मतदान