मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जम्मूत बंदमुळे जनजीवन विस्कळीत
भाषा
सांबा येथे दहशतवादी हल्ल्याविरोधात राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी पुकारण्यात आलेल्या बंदने शहरातील जनजीवन प्रभावित झाले. हल्ल्यात सह जण मृत्युमुखी पडले होते.

दुकाने, बाजार, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असून सार्वजनिक व खाजगी वाहतूकही बंद आहे. कार्यालय व बँकांमध्येही तुरळक उपस्थिती आहे.
जम्मू-काश्मीर प्रदेश कॉंग्रेस समिती, नॅशनल कॉंफरंस, भाजप, जम्मू-काश्मीर नॅशनल पँतर्स पक्ष व शिवसेनेने बंदला समर्थन दिले आहे.

जम्मू विभागातल्या सांबा व कथुवा भागातही बंद पाळण्यात येत आहे. मात्र उधमपूर, राजौरी, पूंच व डोडा जिल्ह्यात बंदला विशेष प्रतिसाद मिळाला नाही.
आणखी
कर्नाटकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 49 उमेदवार
बस नदीत कोसळून आठ जवान ठार
संरक्षण व्यवहारप्रकरणी दत्ता यांची विचारपूस
पवारांचे 'सपुआ'स भक्कम करण्याचे आवाहन
देशात कोठडी मृत्यूच्या संख्येत वाढ
कर्नाटकात पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर?