सर्वोच्च न्यायालयाने जेसिका लाल खून खटल्यात जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या मनू शर्मास जामीन नाकारला आहे. न्यायमूर्ती सी के ठक्कर यांच्या खंडपीठाने शर्माची याचिका फेटाळून लावताना शिक्षा स्थगित करणे किंवा जामीन देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
शिक्षेविरूद्ध याचिका अगोदरच दाखल करण्यात आली असून योग्य वेळी सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाने मनू यांस जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सामाजिक कार्यकर्त्या बीना रमाणी यांच्या कुतुब कोलोनेड रेस्टॉरंटमध्ये 29 एप्रिलच्या रात्री गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
|