मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कुजुम खून खटल्यात रोमेशची याचिका दाखल
भाषा
दिल्ली उच्च न्यायालयाने कुंजुम बुद्धीराजा खून खटल्यात रोमेश शर्माची शिक्षेस आव्हान देणारी याचिका दाखल करून घेतली आहे. शर्मा हा कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमाचा हस्तक असल्याचे कथितरीत्या मानण्यात येते.

न्यायमूर्ती एच आर मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शर्माच्या याचिकेसाठी दिल्ली पोलिसांना नोटीस देऊन तेवीस जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहे. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेली प्रेयसी कुंजुमच्या खुनासाठी शहर न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेस शर्माने चोवीस एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दिल्ली न्यायालयाने शर्मा व इतर पाच जणांना वीस मार्च, 1999 मध्ये कुंजुंमचा खून करण्यासाठी जन्मठेप ठोठावली होती. न्यायालयाने शर्मावर पन्नास हजाराचा दंडही ठोठावला होता. न्यायालयाने पंधरा फेब्रुवारीस त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) 120B (कट, कारस्थान रचने) यासाठी दोषी ठरवले होते.
आणखी
जेसिका खटल्यात मनूस जामीन नाकारला
जम्मूत बंदमुळे जनजीवन विस्कळीत
कर्नाटकात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 49 उमेदवार
बस नदीत कोसळून आठ जवान ठार
संरक्षण व्यवहारप्रकरणी दत्ता यांची विचारपूस
पवारांचे 'सपुआ'स भक्कम करण्याचे आवाहन