मराठीचा मुद्दा उपस्थित करून मनसे नेते राज ठाकरे यांना केवळ राजकीय फायदा उठवायचा असून, त्यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांवर सुरू असलेले अन्याय त्वरित थांबवावेत असा इशारा भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीने दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील उत्तरभारतीय दहशतीच्या वातावरणाखाली जगत असल्याचे सांगतानाच शेजारील घराला लावलेल्या आगीत आपलेही घर जळण्याची शक्यता असते हे राज यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी तिवारीने महाराष्ट्रातील कॉग्रेस सरकारवरही ताशेरे ओढले. सरकारपुढे उत्तर भारतीयांवर हल्ले होत असून सरकार तरीही गप्प असल्याचा आरोपही मनोज तिवारीने केला आहे.
|