अग्नी तीन या संपूर्णतः: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणी नंतर भारतीय वैज्ञानिकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
लवकरच भारतीय लष्करात पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र दाखल करण्यात येणार असून, यानंतर संपूर्ण चिन भारताच्या एकाच क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे.
अग्नी तीनच्या यशस्वी परीक्षणानंतर भारताचा समावेश शक्तिशाली देशांमध्ये झाला असून, चीनकडून देशाला धोका निर्माण होण्याची भिती आता अधिक कमी झाल्याचा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
आता भारतीय वैज्ञानिक पाचहजारचा पल्ला गाठण्याच्या तयारीत असून केवळ सरकारच्या परवानगीची गरज असल्याची माहिती अग्नी तीन अभियानाचे निदेशक अविनाश चंद्र यांनी दिली.
|