मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एलटीटीई समर्थक संघटनावर बंदी घाला:कॉंग्रेस
भाषा
तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कडघम (डीएमके) पक्षाचा प्रमुख सहयोगी कॉंग्रेसने एलटीटीई समर्थक संघटनांवर राज्यात बंदी घालण्याची मागणी करतानाच दहशतवादास कठोरपणे निपटून काढण्याचे आवाहन केले आहे.

दहशतवाद श्रीलंकेतून असो किंवा राज्यातून कठोरपणे मोडून काढला पाहिजे, असे कॉग्रेसनेते डी सुदर्शन यांनी स्पष्ट केले. यासोबतच तमिळनाडू सरकारने एलटीटीईवर बंदीची मुदत वाढवण्याची विनंतीही करावी. केंद्राने प्रथम 1992 मध्ये एलटीटीईवर बंदी घातल्यानंतर मे 2004 मध्ये बंदीची मुदत वाढवण्यात आली होती.

बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत ही बंदी घालण्यात आली होती. चकमकी हे पोलिसांसाठी स्वसंरक्षणाची ढाल असण्यासोबतच असामाजिक तत्त्वापासून सामान्य माणसाचे संरक्षण करण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान विरोधी पक्ष एआयडीएमके पक्षाने राज्यात कायदा व सुरक्षा ढासळली असून तमिळनाडूत 'बॉम्बं संस्कृती' घडत असल्याचा आरोप केला.
आणखी
सोनियांची मंगळवारी कर्नाटकी मोहीमेवर
मुंबई बॉम्बस्फोट:आरोपीच्या मृत्युदंडास स्थगिती
आता संपूर्ण चिन भारताच्या टप्प्यात
कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत- अडवाणी
धमकीमुळे मणीपुरात सिनेमागृहांना टाळे
मनोज तिवारीचा राज यांना इशारा