जम्मू- काश्मीर मधील अमरनाथ देवस्थानाला दिलेली वनजमीन सरकारने परत घेतल्यानंतर विहिंप आणि भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा हिंदूंचा अपमान करणार असून, सरकारला अमरनाथ यात्राच रोखायची असल्याचा आरोप संघाने केला आहे.
याविरोधात विहिंपने पुकारलेल्या बंदला आपला पाठिंबा जाहीर करतानाच सरकारने आपला हा निर्णय मागे न घेतल्यास या विरोधात आणखी तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा संघाने दिला आहे.
|