दूरसंचार विभागाने अखेर कबुल केले, की ब्लॅकबेरी सेवा सुरू केल्यानंतर देशाच्या सूरक्षीतेसाठी या सेवांपासून कोणताही धोका निर्माण होणार नाही.
देशातील सुरक्षा यंत्रणांनी ब्लॅक बेरी सेवा सुरू करण्यास लाल कंदील दाखवल्याने हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
ब्लॅकबेरी सेवेपासून देशाच्या सुरक्षीततेला कोणताही धोका नसून, लवकरच ही सेवा सुरू होईल असे मत दूरसंचार विभागाचे सचिव सिद्धार्थ बेहुरा यांनी व्यक्त केले आहे.
|