अमरनाथ देवस्थानाला दिलेली जमीन सरकारने परत घेतल्यानंतर आज विश्व हिंदू परिषदेने देशव्यापी बंद पुकारला असून, याला आता अखिल भारतीय व्यापारी परिसंघानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या निर्णयानंतर देशभरातील जवळपास पाच कोटी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिसंघाने दिली आहे.
दिल्लीतील ऑफ ट्रेड असोसिएशननेही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनीही या बंदत सहभाग नोंदवला आहे.
|