अमरनाथ देवस्थानाकडून जमिनी परत घेतल्या कारणांवरून भारतीय जनता पार्टी आणि विहिंपने पुकारलेल्या देशव्यापी बंदला मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये जातीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
येथील खजराना, पंढरीनाथ, छत्रीवाल, आदी भागात दोन समुदायात जोरदार दगडफेक सुरू झाली असून, यात दोघांचा बळी गेला आहे. यानंतर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलिस कुमक शहरात वाढवण्यात आली असून, चार पोलिस ठाण्याअंतर्गत कर्फ्यू लावण्यात आला आहे.
शहरात सकाळपासूनच तणाव निर्माण झाला. अनेक भागात दुकाने आणि मॉल्सवर कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. यानंतर काही भागात याला हिंसक वळण लागले आणि दोन समुदायात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.
|