मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इंदूरमध्ये आजही कर्फ्यू सुरूच  Search similar articles
विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या बंदला इंदूरमध्ये हिंसक वळण लागल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने चार भागात कर्फ्यू सुरूच ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

बंद करण्यासाठी विहिंप आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानंतर काल काही भागात एका समुदायाने त्यांना जोरदार विरोध केला, यानंतर दोन समुदायात जोरदार दगडफेक सुरू झाल्याने बंदला जातीय दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या दंगलीत चार जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून जागोजाग दोन समुदायांमध्ये चकमकी होत आहेत.

मल्हारगंज, छत्रीपुरा, पंढरीनाथ या भागात तणावाची परिस्थिती रात्रीपर्यंत कायम होती, तर येथील खजराणा भागात आज तणाव कायम असल्याने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राकेश श्रीवास्तव यांनी दिली आहे.
आणखी
ट्रक चालकांचा संप मागे
आंदोलनाचा कालावधी वाढवण्याचा विहिंपचा निर्णय
सिद्धू प्रणव मुखर्जींवर नाराज
'चिनी लष्कराच्या अत्याधुनिकरणाबाबत दक्ष रहा'
माकपचा अणुकरार बाजूला ठेवण्याचा सल्ला
आरक्षण अंमलबजावणीसाठी लवकरच विधेयक