पुरी येथे आज भरलेल्या जगन्नाथ रथयात्रे दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. या यात्रेत जगभरातून 10 ते 12 लाख भाविक सहभागी झाले असून, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांच्या रथांचे दर्शन घेताना एकमेकांचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यानंतर पोलिस आणि प्रशासनाने भाविकांचा ओघ कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, मृतांमध्ये तिन महिला आणि तिन पुरुषांचा समावेश आहे, तर जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|