डाव्या पक्षांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र दिल्यानंतर ताबडतोड समाजवादी पक्षाने राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना सरकारच्या समर्थनाचे पत्र सुपूर्त केले आहे.
सपातील खासदारांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर सपालाच बहुमताची गरज निर्माण झाली होती. परंतु आता सर्वच खासदार सपाशी प्रामाणिक असल्याचे सांगत पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांनी राम गोपाल यादव यांच्यासोबत राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना पत्र दिल्याचे समजते. पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे या नंतर त्यांनी स्पष्ट केले.
|