मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राजकीय अस्थिरतेवर रालोआचे विचारमंथन  Search similar articles
एएनआय
डाव्यांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोरणनिश्चितीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची येथे बैठक होणार आहे.

भाजपचा अणुकरारास विरोध नसला तरी सद्यस्थितीतील करारास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी मंगळवारी सपुआ सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध करावे, असे स्पष्ट केले होते.

दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आयएईएचे मंडळ करारास लवकरच मान्यता देईल, याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. भारतासंबंधी सुरक्षाविषयक सहकार्यास मान्यता देण्यासंबंधी आयएईए मंडळाची 28 जुलैला बैठक होणार आहे.
आणखी
समाजवादीचे राष्ट्रपतींना समर्थन पत्र
खासदारच काढतायेत 'सायकलची हवा'
'सरकार सत्तेत राहणार, परत सत्तारूढही होईल'
नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन
सरकारने संसदेत बहुमत सिद्ध करावे: डावे
समान नागरी कायद्याचा प्रस्ताव नाही: कायदा आयोग