मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सपा डॉ कलामांची बदनामी करतेय-नक्वी  Search similar articles
अणुकरारा बाबत कलाम यांचे नाव पुढे करत समाजवादी पार्टी मुस्लिम समाजाला फसवत असल्याचे स्पष्ट करत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

या कराराला समर्थन मिळावे यासाठी डॉ कलाम यांनी समाजवादी पक्षाला असे कोणते पुरावे दिलेत की, ज्यामुळे अचानक समाजवादी पक्षाचे हृदय परिवर्तन घडून आले. ही मागणी करतानाच नक्वी यांनी सपावर ताशेरेही ओढले.

देशातील अल्पसंख्याक समाजाला फसवण्यासाठी सपा कलाम यांच्या सारख्या एका महान व्यक्तीच्या नावाचा वापर करत असणे हे देशाचे दुर्भाग्यच असल्याचेही ते म्हणाले.
आणखी
राजकीय अस्थिरतेवर रालोआचे विचारमंथन
समाजवादीचे राष्ट्रपतींना समर्थन पत्र
खासदारच काढतायेत 'सायकलची हवा'
'सरकार सत्तेत राहणार, परत सत्तारूढही होईल'
नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन
सरकारने संसदेत बहुमत सिद्ध करावे: डावे