भारत आणि अमेरिकेदरम्यान करण्यात येणारा अणुकरार देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून फायद्याचाच असल्याचा निर्वाळा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी दिला आहे.
सध्या या मुद्द्यावरून देशात वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणामुळेच डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. हा करार देशासाठी घातक आल्याचे विरोधकांसह डाव्यांचे म्हणणे आहे.
परंतु माजी राष्ट्रपती डॉ कलाम यांनी या कराराला यापूर्वीच हिरवा कंदील दिल्यानंतर आता डॉ काकोडकरांनीही या कराराविषयी चांगले मत व्यक्त केल्यानंतर विरोधक आणि डाव्यांच्या आरोपातील हवा निघून गेली आहे.
|