लोकसभा सभापतिपदाचा राजीनामा देण्यावरून सोमनाथ चॅटर्जी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांच्यातील राजकीय दुरावा वाढत चालला असून त्यामुळे डाव्यांमध्ये सरळ-सरळ दोन गट पडत असल्याचे दिसत आहे. माकपाने बसपा सोबत हात मिळवणी केल्यानेही चॅटर्जी नाराज आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाठिंबा काढून घेतल्याबददल चॅटर्जी यांनी करात यांना लिहिलेल्या पत्रात सरळ नाराजी व्यक्त केली असून त्यांनी त्या पत्रात आपण बहुमत सिद्ध करण्याच्या बैठकीत भाजपा सोबत संपुआ सरकार विरुद्ध मतदान करणार नाही. करात यांनी संपुआचा पाठिंबा काढून घेण्याबाबतच्या राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात चॅटर्जींचे नाव घातल्यापासून त्यांच्यातील वादास तोंड फुटले आहे. चॅटर्जी यांनी सभापतिपदावरून राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
|