सपुआ सरकारला पाठिंबा जाहीर केल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना तेरा कलमी मागण्या सादर केल्या. यावर पंतप्रधानांनी अंमलबजावणीसाठी देखरेख समिती स्थापन करण्यास सहमती दर्शवली.
पंतप्रधानांचा मागण्यास सकारात्मक प्रतिसाद असल्याचे सोरेन यांनी सांगितले. सपुआ सरकार लोकसभेत बहुमत सिद्ध करेल, याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
तेरा कलमी मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी झामुमोचे प्रतिनिधित्व असलेली देखरेख समिती स्थापण्यास त्यांनी होकार दिला. झारखंड, पश्चिम बंगाल व ओरिसातील आदिवासींच्या विकासासाठी मागण्या सादर केल्या आहेत.
पक्षातील एका खासदारास राज्यमंत्रीपदासोबत आपण मंत्रिमंडळात परतणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हक्कापेक्षा अधिक मागण्या केलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|