भारतीय जनता पक्षाचे (भाजप) बंडखोर खासदार सोमाभाई पटेल संपुआ सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पक्षाने जारी केलेल्या व्हिपचे (पक्षादेश) पालन करण्यास आपण बंधनकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. कारण पटेल यांना पक्षातून निलंबित केलेले आहे.
मी माझा निर्णय घेण्यास स्वतंत्र असून विशेष सत्र सुरू होण्यापूर्वी निर्णय जाहीर करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. पटेल गुजरातमधील सुरेंद्रनगर मतदार संघाचे खासदार आहेत.
|