मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अर्जुन टँक वाद चिघळणार  Search similar articles
युध्दप्रसंगी अग्‍नी परीक्षेच्या वेळी अर्जुन टँकचे इंजन फेल झाले होते, असे संयुक्त निरीक्षण समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. मात्र समितीने दिलेला अहवाल मान्य नसल्याचे सेनेने म्हटले आहे. यावरून पुन्हा एकदा अर्जुन टँकचा वाद चिघळण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

सुरक्षा विभागाच्या सुत्रांनी सांगितले, की सेनेने मंत्रालयाला एका पत्राव्‍दारे कळविले आहे की, सुरक्षा मंत्रालय व विकास समिती व डीआरडीओ यांन‍ी केलेल्या परिक्षणाच्या संदर्भात वेगळा निरिक्षण अहवाल दिला जावा मात्र संयुक्त निरीक्षण समितीने याला विरोध दर्शविला आहे. डीआरडीओने अर्जुन टँकच्या प्रदर्शनाच्या बाबत उद्‍भवलेल्या वादापासून वाचण्यासाठी निरीक्षण समितीने तयार केलेल्या अहवालावर अधिकारी व डीआरडीओ प्रतिनिधी यांच्या स्वाक्षर्‍या पाहिजे.

काही दिवसांपूर्वी डीआरडीओने अर्जुन टँकचे इंजन फेल होण्याच्या संदर्भात खुलासा केला होता की, टँकचे इंजिन जळून खाक होण्यासाठी टँकला जाणून बुजून पहिल्या व दुसर्‍या गिअरमध्ये एक हजार किलोमीटरपर्यंत प्रचंड वेगात पळविले गेले होते.
आणखी
भाजपच्या पटेलांचा संपुआला पाठिंबा
'विश्वासमत गमावल्यास अणुकरार सोडून द्या'
सोरेन यांचा पंतप्रधानांना मागण्यांचा खलिता
सत्‍तेचा सारीपाट
सोमनाथदांचे लोकसभाध्यक्षपद न सोडण्याचे संकेत
'कॉंग्रेसकडून 100 कोटींची ऑफर'