लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी माकपविरूद्ध उघड दंड थोपटले असताना पक्षाच्या केंद्रीय समितीने कठोर कारवाई टाळून प्रश्न पॉलिटब्युरोसाठी प्रलंबित ठेवला.
मात्र सोमनाथदांचे समर्थन करणाऱ्या वरिष्ठ नेत्याची कानउघाडणी केली. याप्रश्नी पॉलिटब्युरोने निर्णय घेऊन प्रकरणाची हाताळणी करावी.. काय व कधी योग्य आहे याबाबत निर्णय घ्यावा, असा निर्णय केंद्रीय समितीने घेतल्याचे पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितले.
माकपने अणुसहकार्यकरारावरून सपुआर सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर सोमनाथदांनी लोकसभाध्यक्षपद सोडावे, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. मात्र या घटनादत्त पदाचा पक्षीय राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी पक्षाच्या दडपशाहीविरूद्ध दंड पुकारले आहे.
यासंबंधी घटनाक्रमात केंद्रीय समितीने पश्चिम बंगालचे परिवहनमंत्री सुभाष चक्रवर्ती यांना पक्षाची शिस्त व नियम पाळण्याचे आदेश दिला आहे. सोमनाथदा यांनी राजीनामा देऊन सपुआ सरकारविरूद्ध मतदान मतदान करण्याच्या पक्षाच्या धोरणास त्यांनी विरोध दर्शवला होता.
|