तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी विश्वासमत ठरावाच्यावेळी उपस्थितीबाबत अजूनही अटकळी कायम ठेवल्या आहेत. यासंबंधीचा निर्णय सोमवारी सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही प्रसारमाध्यमांनी आपण अनुपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यासंबंधी आपण माध्यमांशी संवाद साधलेला असून त्यांची स्वतः:चीच भूमिका मांडली असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीसाठीचे उद्याचे दोन तिकिटांचे आरक्षण केल्याचे सांगून विश्वासमत ठरावास लोकसभेत उपस्थितीबाबत पक्ष एकत्रितपणे निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|