मनमोहन सरकारतर्फे लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या विश्वासमत ठराव चर्चेत विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासहित कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधीही भाग घेतील.
पंतप्रधान मनमोहन सिंग लोकसभेत 'सभागृह मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करते' या आशयाचा ठराव मांडून भूमिका स्पष्ट करतील. सपुआ सरकारच्या चार वर्षातील ठळक कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच अणुसहकार्य कराराचे महत्त्व विशद करतील.
दोन दिवसाच्या विशेष सत्रात चर्चा पूर्ण झाल्यानंतर ते चर्चेस उत्तर देतील. विश्वासमत ठरावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन व परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी सपुआ नेत्यांना सभागृहात सरकारची बाजू भक्कमपणे मांडता यावी यासाठी अणुकराराबाबत सखोल माहिती दिली आहे.
|