मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भाजपचे 8 खासदार निलंबित  Search similar articles
वेबदुनिया
संसदेत विश्‍वासमत ठरावाच्‍या वेळी पक्षातून फुटून पक्षविरोधी मतदान व अनुपस्थित राहिल्‍याबददल भाजपने आपल्‍या 8 खासदारांना निलंबित केले आहे. या खासदारांमध्‍ये दमोह मतदार संघाचे खा.चंद्रभान, बृजभूषण शरण, मनोरमा माधवराज, सोमाभाई पटेल, सांगलियाना, बाबूभाई कटारा, मंजूनाथ आणि हरिभाऊ राठोड यांचा समावेश आहे.

संपुआ सरकारने लोकशाही मूल्‍यांचा -हास केल्‍याचा आरोप करीत भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्‍याचाही निर्णय जाहीर केला आहे. भाजपच्‍या सुत्रांनी सांगितले, की पक्षशिस्‍त न पाळणा-याविरुध्‍द पक्षाने नेहमीच कारवाई केली आहे. ज्‍या खासदारांनी पक्षादेश न पाळून पक्ष विरोधी मतदान केले आहे. अशा खासदारांना निलंबित करण्‍याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

पक्षाचया एका ज्‍येष्‍ठ नेत्‍याने आपल्‍या खासदारांनी पक्षादेशाविरुध्‍द मतदान कसे केले याचे आश्‍चर्य वाटत असल्‍याचे सांगितले. दलित महिला पंतप्रधान बनलेले भाजपला नको होते त्‍यामुळे त्‍यांनी कॉंग्रेससोबत मिळून सरकार वाचविले असा बसपा नेत्‍या मायावतींनी केलेला आरोप चुकीचा असल्‍याचे पक्ष नेत्‍यांनी सांगितले आहे.
आणखी
आंध्राच्या मुख्यमंत्र्यांचा पावसासाठी यज्ञ
तिस-या आघाडीची दिल्‍लीत बैठक
संसदेत आणलेले 1 कोटी रुपये पोलिसांकडे
शिखांची आज पंजाब-हरियाणा बंदची घोषणा
तपन सिन्हा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
तपन सिन्हानांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर