मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सोमनाथ चटर्जी यांची पक्षातून हकालपट्टी  Search similar articles
भाषा
लोकसभेचे सभापती व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सोमनाथ चटर्जी यांची अखेर आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर चटर्जी यांनी सभापतिपदाचा राजीनामा द्यावा असा दबाव आणला जात होता. पण चटर्जी यांनी दबावाला भीक न घालता राजीनामा दिला नाही.

श्री. चटर्जी आज स्वतःहून सभापतिपद सोडतील, अशी चर्चा होती. पण पक्षानेच त्यांची हकालपट्टी केली. श्री. चटर्जी यांनी 'गंभीर तडजोड' केली असे कारण त्यांच्या हकालपट्टीसाठी देण्यात आले आहे. आज पॉलिट ब्युरोची यासंदर्भात बैठक झाली. तीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तत्काळ प्रभावाने ही हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षाच्या घटनेनुसार कलम १९ (१३) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षस्थितीशी गंभीर तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. पॉलीट ब्युरोच्या बैठकीला सरचिटणीस प्रकाश करात, सीताराम येचुरी, एम. के. पंधे, एस. आर. पिल्लई आणि वृंदा करात उपस्थित होते.
आणखी
भाजपचे 8 खासदार निलंबित
आंध्राच्या मुख्यमंत्र्यांचा पावसासाठी यज्ञ
तिस-या आघाडीची दिल्‍लीत बैठक
संसदेत आणलेले 1 कोटी रुपये पोलिसांकडे
शिखांची आज पंजाब-हरियाणा बंदची घोषणा
तपन सिन्हा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार