मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय > राष्ट्रवादीत पक्षश्रेष्ठी संस्कृती नाही: संगमा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राष्ट्रवादीत पक्षश्रेष्ठी संस्कृती नाही: संगमा
भाषा
केंद्राप्रमाणेच मेघालयातही राष्ट्रावादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या युतीची शक्यता फेटाळून लावताना राष्ट्रवादीचे सरचिटणीस पी ए संगमा यांनी आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठी संस्कृतीचे पालन करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ येत असल्याचे वृत्त फेटाळून लावताना सत्ताधारी मेघालया प्रोग्रेसिग अलायंसचे (एमपीए) प्रवर्तक संगमा यांनी याबाबत कॉंग्रेससोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात एमपीए आघाडी सरकारमध्ये चांगला तालमेळ असून कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगून कॉंग्रेसप्रमाणे पक्षश्रेष्ठी संस्कृतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संगमा महाराष्ट्रातील प्रश्नात हस्तक्षेप करत नसून शरद पवार मेघालयात हस्तक्षेप करत नाहीत. यासोबत पक्षश्रेष्ठींकडून पक्षाच्या राज्य शाखेत हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेघालयात राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षात तर कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे.
आणखी
आरएसएसवर बंदीस कॉंग्रेसचेही समर्थन
सिमीवरील बंदी कायम, सर्वोच्च न्यायालय
अमरनाथ देवस्थान समिती सदस्यांचे राजीनामे
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी
प. बंगालमध्ये अपघातात बारा भाविक ठार
कोणतेच साहित्य चोरीला गेले नाही- रामचंद्रन