नवी दिल्ली- माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले असून मी निर्दोष आहे. शैलजाची निवड न झाल्याने तिनेच हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप ऑलंपिकमध्ये भारताची एकमेव भारोत्तोलन खेळाडू मोनिका देवी हिने केला आहे. मी डोपिंगमध्ये खरोखर दोषी आढळल्यास मला गोळी घाला असे आव्हानही तिने केले आहे.
बीजिंग ऑलंपिकसाठी निवड झालेली एकमेव भारतीय भारोत्तोलक मोनिका प्रतिबंधित एनाबोलिक साल्टचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळून आली आहे.
|