रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राख्या पोहचवण्यासाठी भारतीय डाक विभागाने अकरा ते वीस ऑगस्टदरम्यान विशेष व्यवस्था केली आहे. दिल्लीतील महत्त्वपूर्ण 34 डाक कार्यालयात विशेष पोस्टिंग काउंटर्स उघडण्यात येणार असून दिल्ली व नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकांवरही ही सेवा राहणार आहे.
शेवटच्या क्षणी गोंधळ टाळण्यासाठी अगोदरच राखी पाठवण्याचा सल्ला खात्याने दिला आहे. ड्यूपॉंटच्या सहकार्याने डाक खात्याने विशेष राखी लिफाफेही उपलब्ध करून दिले आहेत.
|