लोक जनशक्ती पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ जमीनप्रश्नी वादास माजी राज्यपाल एस के सिन्हा हे कारणीभूत असल्याचे वक्तव्य केले आहे. जमीन हस्तांतरणासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय झाला नव्हता किंवा राज्यपालांच्या आदेशातही हस्तांतरणाचा उल्लेख नव्हता.
भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी जमिनीचे तात्पुरते हस्तांतरण होते. मात्र राज्यपालांच्या सचिवाने पत्रकारपरिषदेत जमिनीचे हस्तांतरण करण्यात आल्याचे सांगितल्याने वादास तोंड फुटले, असे पक्षाध्यक्ष रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले.
पररष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील सपुआच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. संपूर्ण प्रकरणात सिन्हा यांची भूमिका योग्य राहिली नाही, त्यांना राज्यपाल बनवायला नको होते.
यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने पूर्वीचीची परिस्थिती कायम राखण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलनास सुरूवात झाली. हे सर्व राजकारण असल्याचे पासवान यांनी सांगितले.
|